Grape Master | Services

Grape Master Services

द्राक्ष उत्पादन व विक्रीसंदर्भात सल्ला व सेवा देणार्या कृषी क्षेत्रातील तज्ञांमार्फत ’ग्रेप मास्टर’ ही संकल्पना चालवली जाते. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मागील काही वर्षांमध्ये ग्रेप मास्टर ने द्राक्ष उत्पादन तसेच विक्री या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवीले आहे. द्राक्षशेती व संबंधीत विषयांमधील ज्ञानाचा तसेच अनुभवाचा उपयोग करून ग्रेप मास्टर द्राक्ष बागायतदारांना देशांतर्गत व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व दर्जा राखण्यासाठी मार्गदर्शन तसेच मदत करत आहे.

★ ग्रेप मास्टरतर्फे दिल्या जाणार्या सेवा.
१. द्राक्ष उत्पादन व विक्री या विषयाला वाहीलेले ’ग्रेप मास्टर’ यू ट्यूब चॅनल: या चॅनलमार्फत द्राक्ष लागवड, आंतरमशागत, अन्नद्रव्ये, किड व रोग व्यवस्थापन, द्राक्षाचा दर्जा तसेच उत्पादन वाढ आणि द्राक्ष उत्पादनविषयक अडचणी सोडविण्यासंदर्भातील व्हीडीओ वेळोवेळी प्रकाशीत केले जातात.
२. ’ग्रेप मास्टर’ अॅन्ड्रॉईड अॅप: द्राक्षबागायतदारांसाठी खास विकसीत केलेले अॅप उत्पादन तसेच दर्जा या संबंधीत विषयांवर वेळेवर व अचूक मार्गदर्शन करते.
३. द्राक्ष उत्पादन सल्ला सेवा (कन्सलटन्सी): कृषी क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्तींमार्फत द्राक्ष बागायतदारांसाठी आंतरमशागत, खते व औषधे व्यवस्थापन, दर्जा व उत्पादनवृद्धीसाठी पुरवीण्यात येणारी सेवा. प्रत्यक्ष शेतावर येवून मार्गदर्शन व येणार्या अडचणी सोडवीण्यासाठी अचूक सल्ला. या मार्गदर्शनाचा उपयोग करून शेकडो द्राक्षबागायतदार देशांतर्गत तसेच परदेशी बाजारांसाठी दर्जेदार द्राक्षे उत्पादीत करत आहेत.
४. ग्रेप मास्टर डायरी: द्राक्ष उत्पादनामधील प्रत्येक विषयाशी उदा. आंतरमशागत, खते व औषधे व्यवस्थापन, दर्जा व उत्पादनवृद्धी संबंधीत मार्गदर्शनपर हस्तपुस्तक. बागेमध्ये वेळोवेळी करावयाच्या कामांची योग्य प्रकारे नोंदींची व्यवस्था.
५. पी.एस. अॅग्रो एक्सपोर्ट्स: द्राक्षे खरेदी, ग्रेडींग, पॅकींग व देशांतर्गत तसेच परदेशी बाजारात विक्री.

★ ग्रेप मास्टर - वैशीष्ठ्ये:
१. प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्याकरीता अनुभवी व तज्ञ लोकांची टिम.
२. १००० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकांच्या बांधापर्यंत पोचलेली दर्जेदार सेवा.
३. ’ग्रेप मास्टर’ यू ट्यूब चॅनलमार्फत हजारो शेतकर्यांना ऑनलाईन मार्गदर्शन.
४. दिवसेंदिवस लोकप्रीय होत असलेले ’ग्रेप मास्टर’ अॅन्ड्रॉईड अॅप.
५. उच्च प्रतीचे तांत्रीक ज्ञान व त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष बागेमध्ये वापर यांची सुयोग्य सांगड.
६. अपेक्षीत दर्जा व उत्पादन हमखासपणे मिळवून देण्याची क्षमता.
७. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचा दांडगा अनुभव.
८. देशांतर्गत तसेच परदेशी बाजारांमध्ये द्राक्षविक्रीसाठी बागायतदारांना मार्गदर्शन.
९. शितगृह, पॅकींग शेड व द्राक्षविक्रीसंदर्भातील सर्व सोयीसुविधांनी युक्त स्वत:ची यंत्रणा.
१०. परदेशी बाजारपेठांमधील व्यापारी संस्थांशी व्यवहाराचा अनुभव.

Grape Master APP

Our Related sites:-