image
images Sep 11, 2023

Bench grafting

1.Bench grafting

1. Manure Management -

• Before sowing well rotted cow dung at the rate of 10 tonnes per hectare should be mixed well with the help of a harrow.

• 25 kg of nitrogen and 50 kg of phosphorus per hectare. For more production, gypsum should be given at the rate of 400 kg (200 kg at sowing, remaining 200 kg at tillering) per hectare along with chemical fertilizers. This helps in easy penetration of the seeds into the soil and feeding of the pods.If fertilization is to be done by drip, 100 percent of the recommended fertilizer rate (25:50:00 Nitrogen, Phosphorus, 5 kg per hectare) in soluble form should be applied through drip irrigation in 9 equal installments.

2. interworking -

• Keep the crop stress free by weeding 2 times up to 45 days after planting. 10 to 12 days interval should be done 2 times.

• The last furrow should be given a little deeper. Therefore, the crop gets soil addition.

• Do not do intercropping after Arya leaves (35 to 40 days). Only large stems should be uprooted.

If herbicides are to be used for weed control, spray pendimethalin (pre-emergence) at the rate of 1 kg per 500 liters of water per hectare on suitable soil within two days after sowing.

• Spray imazethapyr (10 percent SL) at 750 ml per 500 liters of water per hectare after weed emergence 20 days after sowing.

3. Water management

• Summer groundnut requires 70 to 80 cm of water. Plastic cover technique for cultivation saves 40 to 50 percent of water.

• First watering of fermentation should be done 4 to 5 days after sowing. After that water should be applied 10 to 12 times at an interval of 8 to 10 days according to the depth of the soil. Water stress should not be allowed at the time of penetration of Aya into the soil and also during the feeding period of pods.


 

बेंच ग्राफ्टिंग

१. खत व्यवस्थापन -

• पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १० टन प्रमाणे कुळवाच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळावे.

• हेक्टरी नत्र २५ किलो व स्फुरद ५० किलो द्यावे. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांसोबत जिप्सम ४०० किलो (पेरणीवेळी २०० किलो, तर उर्वरित २०० किलो आर्‍या सुटताना) प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. त्यामुळे आय जमिनीत सुलभरीत्या जाण्यास तसेच शेंगा पोसण्यास मदत होते.

• ठिबकद्वारे खते द्यायची असल्यास, शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के खते (२५:५०:०० नत्र, स्फुरद, पालाश किलो प्रति हेक्टर) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून ९ समान हप्त्यांत विभागून द्यावीत.

२. आंतरमशागत - 

• लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत २ वेळा खुरपण्या करून पीक ताणविरहित ठेवावे. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ कोळपण्या कराव्यात.

• शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.

• आर्‍या सुटू लागल्यानंतर (३५ ते ४० दिवस) आंतरमशागतीची कामे करू नयेत. फक्त मोठी तणे उपटून टाकावीत.

• तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करायचा असल्यास, पेरणीनंतर दोन दिवसांच्या आत योग्य ओलीवर पेंडीमिथॅलिन (उगवणपूर्व) १ किलो प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.

• पेरणीनंतर २० दिवसांनी तण उगवणीनंतर इमॅझेथंपीर (१० टक्के एसएल) ७५० मिलि प्रति ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

३. पाणी व्यवस्थापन

• उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सेंमी पाणी लागते. लागवडीसाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्रामुळे ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.

• पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी आंबवणीचे पहिले पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या १० ते १२ वेळा पाळ्या द्याव्यात. आया जमिनीत घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.

• भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. तुषार सिंचनामुळे पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन वाढीसाठी उपयुक्त ठरते.


payment success

Your order has been successfully processed! Please direct any questions you have to the store owner. Thanks for shopping

continue browsing

your order is being processed

We Have Just Sent You An Email With Complete Information About Your Booking