image
images Sep 12, 2023

Cobra

Symptoms and Remedies -

If yellow / white stripes appear on the leaves of any crop, it should be considered that the snake worm is infested. The adult form of this worm is the black fly. The black fly lays up to 250 eggs at a time on the underside of a leaf. The eggs hatch in about 10 days and small larvae emerge. The worm forms a tunnel by entering the two pores of the leaf. The caterpillar moves along the tissue of the leaf as it travels in zigzag lines.In two to three weeks, when the caterpillar is fully grown, it emerges from the leaf and descends to the ground and burrows two to three inches into the soil. After 15 days black fly emerges from that cell.

This pest spoils the quality of vegetable crops. Insect infestation reduces the food producing activity of the leaves, thus reducing the yield. The pest remains dormant during winter and starts to appear as soon as the temperature rises. Insecticide spraying is of little use as this worm lives inside the leaf.

Control :-

1. Bacillus thuringiensis :- For control of snake worms on soybean crops.

2. Carbofuron 3% c.g. :- Topical application for control of bollworm on citrus crops.

3. Cyantraniliprole 10.26% OD :- Two sprays at ten days interval in the early stage of crop for control of bollworm on tomato crop.

4. Deltamethrin 2.8% EC, Lambda Cyhalothrin 5% EC, Quinalphos 25% EC. :- For control of snake worms on groundnut crop.

5. Imidacloprid 17.8% S.L. :- For control of bollworm on citrus crops.

6. Chlorantraniliprole 8.8 + Thiomithozam 17.5 s.c. :- Soil inoculation for control of bollworm on tomato crops.

 

नागआळी

लक्षणे व उपाय -

कोणत्याही पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते. काळी माशी पानाच्या मागच्या बाजूने एकावेळी २५० पर्यंत अंडी घालते. सुमारे १० दिवसात अंडी उबून त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात. पानाच्या दोन पापुद्र्या मध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते. ही अळी पानातील टिश्यू खात - खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात. दोन - तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन - तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते. १५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते.

या किडीने भाजीपाला पिकाचा दर्जा बिघडतो. किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते. हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो. पानाच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने कीटकनाशकाच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.

नियंत्रण :-

१. बॅसिलस थुरिनजीनसिस :- सोयाबीन पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.

२. कार्बोफुरॉन ३% सि.जी. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून देणे.

३. सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओडी :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.

४. डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी., लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी., क्विनालफॉस २५% ई.सी. :- भुईमूग पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.

५. इमिडाक्लोप्रीड १७.८% एस.एल. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.

६. क्लोरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोझाम १७.५ एस.सी. :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून आळवणी करणे.


payment success

Your order has been successfully processed! Please direct any questions you have to the store owner. Thanks for shopping

continue browsing

your order is being processed

We Have Just Sent You An Email With Complete Information About Your Booking