Grape Master|Home

welcome to Grapes Master

प्रिय द्राक्षबागायतदार बंधू, कायम बदलत रहाणारे वातावरण, देशांतर्गत व परदेशी ग्राहकांची बदलत जाणारी गरज, जमिनीचे आरोग्य, रसायनांचा वाढत चाललेला वापर या गोष्टींमुळे द्राक्षशेती दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चालली आहे. तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल आत्मसात करून त्यानुसार बागेचे व्यवस्थापन केल्यास दर्जा व उत्पादनात अपेक्षीत बदल घडवून आणले जाऊ शकतात. परंतू प्रत्येक द्राक्ष बागायतदारास या बदलांची माहीती होईलच असे नाही. याचाच विचार करून, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी आम्ही ’ग्रेप मास्टर’ डायरी आपल्या सेवेत सादर करीत आहोत. कमीत कमी खर्चात द्राक्षबागेचे व्यवस्थापन करून निर्यातक्षम उत्पादन व दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा समावेश या डायरीत केलेला असून अतीशय माफक किमतीत ही डायरी बागायतदारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ’ग्रेप मास्टर’ डायरीचा उपयोग एक मार्गदर्शक हस्तपुस्तीका म्हणून बागायतदारांना नक्कीच होईल याची आम्हाला खात्री आहे. डायरीमध्ये नवनवीन विषयांचा समावेश करून ही डायरी अधिकाधिक उपयोगी होण्यासाठी आपल्या बहूमोल सल्ल्याची व सूचनांची आम्हाला नितांत गरज आहे. आपल्या सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करू. येणार्याच हंगामासाठी आपल्याला ’ग्रेप मास्टर’ तर्फे मनापासून शुभेच्छा !!!

eco system

बदलत्या हंगमानुसार कसे असावे द्राक्ष बागेची नियोजन ?

recycling

कमीत कमी खर्चात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करुन निर्यातक्षम उत्पादन व दर्जा कसा मिळवणार?.

water refine

कसे असावे बागेचे पाण्याचे योग्य नियोजन.?

Right system

कसे असावे आंतरमशागत, खते व औषधे व्यवस्थापन?तुमच्या मनात देखील आहेत ना हे प्रश्न चला तर मग डाउनलोड करा ग्रेप मास्टर ऍप..

Grape Master APP

Our Related sites:-